महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT-CET) ही महाराष्ट्रातील संस्थांमध्ये अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, फार्मसी आणि कृषी प्रवेशासाठीची परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र द्वारे घेतली जाते. यापूर्वी जूनमध्ये होणारी प्रवेश परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई मेन) आणि राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. या परीक्षेच्या संभाव्य तारखांचे वेळापत्रक ऑफिशिअल वेबसाईटवर जारी करण्यात आले आहे.
CET वेळापत्रक. pic.twitter.com/79M1KYS5Wq
— Uday Samant (@samant_uday) May 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)