आजचा दिवस गुरू पौर्णिमेचा दिवस आहे. आयुष्याला वळण देणार्या व्यक्तिमत्त्वाप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. कला, शिक्षण यासोबतच राजकीय क्षेत्रातही गुरूस्थानी असणार्या व्यक्तिमत्त्वाला या दिवशी पूजलं जातं. महाराष्ट्रासह देशपातळी वर देखील आज गुरू पौर्णिमेच्या निमित्त राजकीय नेत्यांनी आपल्या गुरू बद्दलचं प्रेम व्यक्त करत दिवसाची सुरूवात केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गुरू पौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले आहे.
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच.
विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही....
गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन...#गुरुपौर्णिमा pic.twitter.com/NKYUBOYQXk
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022
संजय राऊत
शिवसेनेची धडाडती तोफ संजय राऊत यांनी देखील बाळासाहेबां सोबतचा फोटो शेअर केला आहे.
वो ही 'गुरू'... 'गुरूर' भी वो ही!
जय महाराष्ट्र!! pic.twitter.com/KFSWxUlYvw
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 13, 2022
राहुल गांधी
गुरु अपने शिष्य को अज्ञान रुपी अंधकार से ज्ञान रुपी प्रकाश के मार्ग पर लेकर जाते हैं, त्याग और तपस्या की राह दिखाते हैं।
गुरुजनों के प्रति सम्मान और कृतज्ञता अर्पित करने वाले पावन पर्व, गुरु पूर्णिमा की ढेरों बधाई एवं शुभकामनाएं और सभी गुरुजनों को मेरा सादर प्रणाम।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 13, 2022
शरद पवार
ज्ञान, जीवनमूल्ये आणि विवेकाचे बीज आपल्यामध्ये पेरणाऱ्या सन्माननीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!#गुरूपौर्णिमा pic.twitter.com/ZZ7FFCUy52
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)