2018 साली दुसर्या शनिवारी आलेल्या आंबेडकर जयंतीच्या दिवशी काम करणाऱ्या 'राऊंड-द-क्लॉक शिफ्ट कामगारां'च्या दुप्पट वेतनाचा दावा करत कामगार संघटनेच्या सदस्यांनी न्यायालयात दावा केला होता. त्यांच्यामते आम्ही दुसऱ्या शनिवारी काम केले. पण कामगारांना सुट्टीच्या दिवशी काम करण्याचा लाभ आधीच दिला असल्याने त्यांना दुहेरी लाभ देता येणार नाही, असे सांगून व्यवस्थापनाने त्यांचा दावा फेटाळून लावला होता. त्यावर सुनावणी दरम्यान टीपण्णी करताना 'डॉ. आंबेडकर यांनी भीमजयंती ला सुट्टी ऐवजी अधिक काम करण्याच्या सूचना दिल्या असत्या' असं Justice GR Swaminathan म्हणाले आहेत.
पहा ट्वीट
Dr Ambedkar Would Have Asked People To Work Extra, Not Declare It As Holiday: Madras High Court On Ambedkar Jayanti Holiday @UpasanaSajeev #nationalholiday https://t.co/sVa1201Svg
— Live Law (@LiveLawIndia) April 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)