Saharanpur Train Derailed: उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये रविवारी रेल्वे अपघाताची घटना समोर आली आहे. ज्यात एक पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरून दुसऱ्या रुळावर गेले. ही ट्रेन दिल्लीहून सहारनपूरच्या दिशेने जात होती.या घटनेनंतर रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मदतकार्य सुरू केले. गेल्या महिन्यातही रेल्वे अपघात झाला होता, आज आंध्र प्रदेशातील विशाखा रेल्वे स्थानकावर रेल्वेला आग लागल्याची घटना समोर आली आहे. सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांमुळे रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.हेही वाचा: Shatabdi Express Stone Pelting Incident: शताब्दी एक्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक, खिडक्यांचे नुकसान, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Uttar Pradesh: In Saharanpur district, a passenger train derailed, with two coaches going off the tracks and onto another line. The 01619 passenger train had arrived from Delhi to Saharanpur. Railway officials and staff are present at the scene pic.twitter.com/Uznr0UV5xG
— IANS (@ians_india) August 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)