IIT Job Crisis: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये सत्र 2023-24 मध्ये शिकणाऱ्या 38 टक्के विद्यार्थ्यांना अजूनही नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत. आयआयटी दिल्लीच्या सुमारे 400 विद्यार्थ्यांसह इतर सर्व 23 कॅम्पसमधील 7 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अजूनही प्लेसमेंट मिळाले नाही. आयआयटी दिल्ली, आयआयटी बॉम्बे आणि बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सने प्लेसमेंटसाठी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांची मदत घेतली आहे. आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी धीरज सिंह यांनी यंदाच्या प्लेसमेंटसंदर्भात अनेक आरटीआय अर्ज दाखल केले होते. त्यांच्या प्रतिसादात 38 टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आयआयटीची प्लेसमेंट ड्राइव्ह संपणार आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. प्लेसमेंटसाठी नोंदणी केलेल्या 21,500 आयआयटी विद्यार्थ्यांपैकी फक्त 13,410 जणांना नोकऱ्या मिळालाय आहेत. अजूनही 8,090 विद्यार्थी नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. याआधी मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये, 23 टक्के म्हणजेच 4 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली नव्हती. याआधीही 2022 मध्ये 3 हजार, सुमारे 19 टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत. (हेही वाचा: TikTok Layoffs: टिकटॉक कंपनीमध्ये टाळेबंदीची घोषणा; 1,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी - रिपोर्ट)
पहा पोस्ट-
🚨 38% of IITians across 23 campuses remain unplaced in 2024. (RTI)
Out of 21,500 IIT students who registered for placements, only 13,410 secured jobs, leaving 8,090 searching for employment. pic.twitter.com/oEuQepqGXz
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) May 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)