नुकतेच कलकत्ता उच्च न्यायालयाने एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले की, अगदी थोड्या प्रमाणात जरी गुदमैथुन झाले असले तरी, ही गोष्ट भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 377 (अनैसर्गिक अपराध) अंतर्गत गुन्हा आहे. न्यायालयाने या प्रकरणातील कलम 377 अन्वये गुन्हा आणि एका वैद्यकीय विद्यार्थ्याच्या लैंगिक छळाचे आरोप असलेले फौजदारी खटले रद्द करण्यास नकार दिला.
या प्रकरणामधील आरोपीवर कलम 377 अंतर्गत गुन्हा केल्याबद्दल आरोप ठेवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनैसर्गिक लैंगिक संबंधांमध्ये शिक्षा होऊ शकते. या प्रकरणातील दोन आरोपींपैकी एक असलेल्या डॉक्टरने आपले जबरदस्तीने कपडे उतरवले आणि सुमारे दोन तास आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. फिर्यादीने पुढे दावा केला की, दोन्ही आरोपींनी या घटनेबद्दल कोणाशीही बोलू नये अशी धमकी दिली होती. मात्र वैद्यकीय अहवालात पूर्ण प्रकारे गुदमैथुन झाल्याची कोणताही इजा किंवा पुरावा सापडला नसल्याचे समोर आले होते. यावर न्यायमूर्ती शम्पा दत्त (पॉल) यांनी म्हटले की, अपूर्ण गुदमैथुन हे देखील एक प्रकारचे मैथुन आहे आणि तोच आयपीसीच्या कलम 377 अंतर्गत गुन्हा ठरवणारा घटक असू शकतो.
Forced Anal Sex: Penetration, however little, is an offence under Section 377 IPC, rules Calcutta High Courthttps://t.co/RJla3JyB7k
— Bar & Bench (@barandbench) February 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)