Hyderabad Fire News: हैदराबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये (Five-Star Hotel In Hyderabad) अचानक आग (Fire) लागल्याची बातमी समोर आली आहे. हे तेच हॉटेल आहे जिथे आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबाद (SRH) चे खेळाडू राहत होते. हॉटेलच्या एका मजल्यावर आग लागताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला कळवले. काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली. तथापि, खबरदारीचा उपाय म्हणून, संपूर्ण SRH संघाला पार्क हयात हॉटेलमधून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही.

हैदराबादमध्ये  पंचतारांकित हॉटेलमध्ये आग - 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)