आतापर्यंत दिल्ली मेट्रोमधील अश्लील कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण दिल्ली मेट्रोमध्ये एका व्यक्तीने प्लास्टिकच्या बाटलीत मुत्रविसर्जन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करणारे प्रवासी संतापले आहेत. अशा लोकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

17 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये मेट्रो ट्रेनमध्ये एक व्यक्ती प्लास्टिकच्या बाटलीत मुत्रविसर्जन करताना दिसत आहे. या मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, व्हिडिओतील व्यक्ती ही त्याची मजबुरी असल्याचे सांगताना ऐकू येते. म्हणजे बळजबरीने तो मेट्रोत हे कृत्य करतोय. सध्या या व्यक्तीचे नाव काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)