देशाची राजधानी (National Capital ) दिल्लीतील (Delhi) विषारी हवेमुळे लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. घरातून बाहेर पडताच लोकांना गुदमरल्यासारखे वाटते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, राष्ट्रीय राजधानीतील दिल्ली वायु गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) 'अत्यंत खराब' श्रेणीत पोहोचला आहे. वायू प्रदूषणाबाबत दिल्लीच्या कर्तव्य पथचा व्हिडिओ समोर आला आहे. खराब वायुप्रदूषणामुळे संपूर्ण परिसर ढगांनी झाकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. म्हणजेच देशाची राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाबाबत जी परिस्थिती आहे. ते पाहता डिसेंबर महिन्यातही दिलासा मिळणार नसल्याचे दिसते.
पाहा पोस्ट -
#WATCH | Delhi: Air Quality Index (AQI) in 'Very Poor' category in the National Capital as per the Central Pollution Control Board (CPCB).
(Visuals from Kartavya Path, shot at 7:15 am) pic.twitter.com/HeHn1FvH3P
— ANI (@ANI) December 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)