अयोद्धेमध्ये काल राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आज भाविकांची मोठी गर्दी पहिल्याच दिवशी पहायला मिळाली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार योगी आदित्यनाथ यांनी याबाबत अधिकार्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर तातडीने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आणि त्यांनीही स्वतः तडकाफडकीने हेलिकॉप्टर मधून व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. अयोध्येत आज सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. तितक्याच संख्येने भाविक दर्शनाच्या प्रतीक्षेत असून, भाविकांना अखंड दर्शन मिळावे यासाठी स्थानिक प्रशासन सर्व व्यवस्था करत आहे. Ayodhya Ram Mandir: अयोद्धेचं रामलल्लांचं मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं; पहिल्याच दिवशी भाविकांची तोबा गर्दी .
पहा ट्वीट
#WATCH | Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath conducts an aerial survey of the Shri Ram Janmabhoomi Temple premises in Ayodhya as devotees continue to arrive here for the darshan of Ram Lalla. pic.twitter.com/IlhWppFo3g
— ANI (@ANI) January 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)