Delhi BJP Third Candidate List: दिल्ली भाजपने तिसऱ्या यादीत फक्त एकच नाव जाहीर केले, करावल नगरचे आमदार मोहन सिंग बिष्ट यांना मुस्तफाबाद मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे. खरं तर, भाजपने दुसऱ्या यादीत, विद्यमान आमदार मोहन बिष्ट यांना तिकीट देण्याऐवजी करावल नगर मतदारसंघातून कपिल मिश्रा यांना उमेदवारी दिली होती, ज्यामुळे आमदार बिष्ट बरेच नाराज दिसत होते.

एका वृत्त वाहीनीशी बोलताना मोहन सिंग बिष्ट भावनिक झाले आणि रडत रडत ते म्हणाले की, भाजप हायकमांड जो काही निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल. यानंतर लगेचच पक्षाने फक्त एकाच नावाची तिसरी यादी प्रसिद्ध केली आणि त्यांना मुस्तफाबाद मतदारसंघातून तिकीट दिले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)