जी-20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन शुक्रवारी भारतात आले. यावेळी रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही के सिंग यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटीदेखील आपल्या मुलीसह विमानतळावर उपस्थित होते. राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि केंद्रीय मंत्र्यांशीही थोडक्यात चर्चा केली. विमानतळावरून बिडेन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेले. या ठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक चालू आहे. दिल्लीमधील 7, लोककल्याण मार्गावर असलेल्या पीएम मोदींच्या निवासस्थानी ही चर्चा होत आहे. यांच्या चर्चेत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे आणि त्यामुळे भारत व यूएसए यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळेल. (हेही वाचा: World Bank Lauds India’s Progress: जी-20 पूर्वी जागतिक बँकेकडून भारताची प्रशंसा; म्हणाले- '50 वर्षांचे काम अवघ्या 6 वर्षात केले')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)