सध्या सोशल मिडियावर बँगलोरमधील एका ऑटो ड्रायव्हरचा (Bangalore Auto Driver) व्हिडीओ व्हायरल होत असून आपल्या रिक्षातून प्रवास करणाऱ्या ग्राहकांशी तो हुज्जत घालताना दिसत आहे. दोन हिंदी (Hindi) बोलणारे ग्राहक त्याच्या रिक्षातून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. हे प्रवासी रिक्षा चालकाला हिंदीमध्ये बोलण्याचा आग्रह करत होते तर चालक हा कन्नडमध्ये तुम्ही बोला असे बोलत होता. ही आमची जमीन आहे, आम्ही हिंदी का बोलू असे रिक्षा चालक प्रवाशांना बोलत असल्याचे दिसत आहे.  या व्हिडीओवर (Viral Video) सोशल मिडीयामध्ये दोन गट पडलेले पहायला मिळाले असून काही लोक रिक्षाचालकाचा पक्ष घेत असून काही लोक प्रवाशांची.

पहा व्हिडीओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)