आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. दर्शनीजवळ लग्नाच्या वऱ्हाडांनी भरलेली बस अनियंत्रित होऊन सागर कालव्यात पडली. या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तेथे अनेक जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी बसमध्ये 35 ते 40 जण प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या रिसेप्शनसाठी काकीनाडा येथे जाण्यासाठी लग्नाच्या मंडळींनी आरटीसी बस भाड्याने घेतली होती. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Andhra Pradesh: Seven dead, several injured after a bus plunged into Sagar canal in Prakasam district. Rescue operation underway. pic.twitter.com/64Ptd1aomc
— ANI (@ANI) July 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)