Assembly Election Results 2023 Updates: मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक 2023 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (3 डिसेंबर) पार पडत आहे. सकाळी आठ वाजलेपासून मतमोजणी सुरु होत आहे. एक्झिट पोल्सनी आगोदरच असे सूचित केले आ आहे की, राज्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. या निकालांवरून राज्यात काँग्रेस आणि सत्ताविरोधी लढाईची चुरस दिसून येत आहे. त्यामुळे क्षणाक्षणाला उत्सुकता वाढविणाऱ्या या निवडणुक निकालाचे ABP News लाईव्ह स्ट्रिमिंग आपण येथे पाहू शकता.
दरम्यान, रविवारी सकाळी होणार्या मतमोजणीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मध्य प्रदेश पोलिस पथकांना महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. तसेच, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अधिकारी आणि जवानांच्या कडोकोट बंदोबस्तात स्ट्राँग रूममधून मतमोजणी केंद्रांपर्यंत ईव्हीएम स्थानांतरीत करण्यात आले आहेत. भोपाळचे पोलिस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांनी एएनआयला सांगितले की, रविवारीही वाहतूक मुख्य रस्त्यावरून वळवली जाईल. (हेही वाचा, Assembly Election Results 2023 Updates: पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी; भाजप विरुद्ध काँग्रेस काट्याची टक्कर)
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)