Madras High Court: अपघातग्रस्त वाहनाचा चालक त्यावेळी दारूच्या नशेत असला तरी विमा कंपनी मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार असेल.  या खटल्यात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. धंडापाणी यांच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाने दिलेल्या भरपाईत वाढ करण्यासाठी अपीलकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. 30 डिसेंबर 2017 रोजी चेन्नईतील घनकचरा व्यवस्थापन कार्यालयाजवळ थिरुनेरमलाई मेन रोडच्या डाव्या बाजूला चालत असताना एका वेगाने आणि बेपर्वाईने चालविलेल्या व्हॅनने मागून धडक दिल्याने राजशेखरन यांचा जागीच मृत्यू झाला होता. 2013 मध्ये केरळ उच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करून न्यायालयाने असे म्हटले की,  पॉलिसी दस्तऐवजात दारू पिऊन गाडी चालवणे हे पॉलिसीच्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन आहे अशी अट असली तरीही विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार असेल. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राजशेखरनच्या कुटुंबातील भुवनेश्वरी आणि इतरांनी दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी करताना न्यायालयाने हे सांगितले.

येथे पाहा, पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)