ITBP Band Playing 'Om Jai Jagdish harey' at Badrinath Temple: हलक्या हिमवर्षाव आणि पावसाच्या दरम्यान, गढवाल हिमालयातील जगप्रसिद्ध बद्रीनाथ धामचे दार गुरुवारी धार्मिक विधींसह भाविकांसाठी खुले करण्यात आले. ब्रह्मा बेलामध्ये सकाळी 7:10 वाजता भगवान बद्रीविशाल मंदिराचे दरवाजे संपूर्ण वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनी भाविकांसाठी उघडण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पहिली पूजा करण्यात आली. मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या प्रसंगी हजारो भाविक धाममध्ये उपस्थित होते. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली. दरम्यान, यावेळी बद्रीनाथ मंदिरात ITBP बँडने 'ओम जय जगदीश हरे' ची धून वाजवली. बँडवर वाजवलेली ही धून सध्या सोशल मीडियावर चांगलीचं व्हायरल झाली आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी ITBP बँडचं कौतुक केलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)