जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI च्या काही सेवा उद्या म्हणजेच बुधवारी (15 सप्टेंबर) 2 तास बंद राहतील. या काळात एसबीआय ग्राहक कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. भारतीय स्टेट बँकेने ट्विटरवर अलर्ट जारी करून ही माहिती दिली आहे.

एसबीआयने ट्विटरवर म्हटले आहे की, मेंटेनन्सचे काम चालणार असल्याने 15 सप्टेंबरला बँकेच्या काही सेवा बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, Yono, Yono Lite आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील. एसबीआयने एका ट्विटद्वारे म्हटले आहे की, 15 सप्टेंबर रात्री 12 ते 2 (120 मिनिटे) या सेवा उपलब्ध होणार नाहीत.

एसबीआयच्या सेवा 2 तास बंद- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)