Delhi Excise Policy: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांची न्यायालयीन कोठडी 17 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. सीसोदिया यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणेने सिसोदिया यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. तपासात काही गोष्टी शिल्लक राहिल्या असून त्या अत्यंत महत्त्वाच्या असून तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे या पथकाने म्हटले होते. यापूर्वी 31 मार्च रोजी न्यायालयाने माजी उपमुख्यमंत्र्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
Rouse Avenue Court extends judicial custody of Delhi's former Deputy Chief Minister Manish Sisodia till April 17, 2023, in CBI's case related to alleged irregularities in the now-scrapped excise policy. pic.twitter.com/3DoBqQgwQj
— ANI (@ANI) April 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)