Woman Lawyer Attack TT: सीमांचल एक्स्प्रेसच्या (Seemanchal Express)2nd एसी कोचमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाने टीसीला मारहाण केल्याची घटना घडली. दिल्ली ते बिहार प्रवासादरम्यान टीसीने महिला प्रवाशाला तिकीट (Train Ticket) मागितले असता तिने टीसीसोबत हुज्जत घालत प्रचंड गोंधळ केला. प्रवासी महिली पेश्याने वकिल (Lawyer) असल्याने तिनेही कायदेशीर बाजूंचा आधार घेतला. टीसीचे म्हणणे महिला प्रवासी एकत नसल्याने नंतर पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालावे लागले. परिणामी, आरोप प्रत्यारोप वाढल्याने सहप्रवासीही महिलेवर संतापले. त्यानंतर ट्रेनमधून महिलेला उतरवण्यात आले. त्यानंतर महिलेने टीसीला मारहाण केली. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे महिलेने टीसीचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला.

महिला वकिलाची दादागिरी, विना तिकीट प्रवास

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)