ED Summons Mahua Moitra: अंमलबजावणी संचालनालयाने तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांना कथित रोख रकमेच्या प्रकरणात 19 फेब्रुवारी रोजी एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. महुआ मोईत्रा यांना 19 फेब्रुवारी रोजी एजन्सीसमोर हजर राहावे लागणार आहे. कथित कॅश फॉर क्वेरी प्रकरणात त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत सीबीआयच्या प्रश्नावलीला त्यांचे उत्तर पाठवले आहे. ED ने महुआ मोईत्रा यांना फेमा उल्लंघन प्रकरणी समन्स बजावले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली. भेटवस्तूंच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप भाजपचे लोकसभा खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता.
Enforcement Directorate issues summons to TMC leader Mahua Moitra asking her to appear before the agency on February 19 in alleged cash-for-query case: Sources
(File photo) pic.twitter.com/i989FThUX8
— ANI (@ANI) February 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)