Bomb Threat To Air India Express Flight: दुबई-जयपूर (Dubai-Jaipur) एअर इंडियाच्या विमानाने शनिवारी पहाटे बॉम्बच्या धमकीमुळे (Bomb Threat) जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. बॉम्बच्या धोक्याबाबत अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आल्यानंतर जयपूर विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली. 189 प्रवाशांसह विमान सकाळी 1.20 वाजता विमानतळावर सुरक्षितपणे उतरले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक IX-196 ला शनिवारी सकाळी 12:45 वाजता बॉम्बची धमकी मिळाली. विमानाची कसून तपासणी करण्यात आली पण काहीही संशयास्पद आढळले नाही.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)