Bihar IAS Transfer: या बदल्यांमध्ये भोजपूर, शिवहर, जमुई, लखीसराय, रोहतास, अररिया, समस्तीपूर, बेगुसराय, शेखपुरा, किशनगंज, अरवाल, मधेपुरासह 12 जिल्ह्यांचे डीएम बदलण्यात आले आहेत. यासोबतच पाटणा, मोतिहारी, शिवहार आणि गया या चार जिल्ह्यांमध्ये नवीन उपविकास आयुक्त (DDC) तर कटिहार, पूर्णिया आणि गया या तीन महापालिकांमध्ये महापालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोतिहारीचे डीडीसी समीर सौरभ यांना पटनाचे डीडीसी आणि पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असलेले वैभव श्रीवास्तव यांना माहिती आणि जनसंपर्क विभागाचे संचालक बनवण्यात आले आहे. पाटणाचे डीडीसी तनय सुल्तानिया भोजपूरचे डीएम बनले आहेत. (हेही वाचा:IAS Officer Transfer: मिलिंद म्हैसकर, उदय चौधरी यांच्यासह राज्यातील 5 आयएएस अधिकाऱ्यांची बदली)
बिहारमध्ये 43 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Bihar Government Transfers 50 IAS Officers In Major Administrative Rejig https://t.co/yCRvEOggQq pic.twitter.com/3ni1Z66od7
— NDTV News feed (@ndtvfeed) September 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)