Old Age Pension in Delhi: दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सरकारने वृद्धांना मोठी भेट दिली आहे. आम आदमी पार्टीने दिल्लीतील 80 हजार वृद्धांना पेन्शन देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दिल्लीत आता एकूण पाच लाख 30 हजार वृद्धांना पेन्शन मिळणार आहे. त्यासाठी गेल्या 24 तासात 10 हजार अर्ज आले आहेत. भाजपवर निशाणा साधताना अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले,'भाजप सरकारच्या काळात वृद्धांना केवळ पाचशे ते एक हजार रुपये पेन्शन दिली जात होती. दिल्लीतील वृद्धांना 2500 रुपये दिले जाणार आहेत.
Arvind Kejriwal’s Big Push: 80,000 additional seniors to get old-age pension in Delhi#ArvindKejriwal #AamAadmiParty #OldAgePension #NewPensionScheme #delhicm pic.twitter.com/V6zqkEYWVJ
— Business Today (@business_today) November 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)