UP: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एक गंभीर घटना समोर आली आहे. त्यातच भाजलेले हरभरे खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ४ जणांची प्रकृती खालावली तर दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला, तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुलंदशहर शहरातील नरसेना पोलीस स्टेशन हद्दीतील महमूदपूर बरवाला गावात राहणारे कलुआ रविवारी घरी भाजलेले हरभरे त्यांच्या पत्नी, मुली आणि भावाच्या नातवाने खाण्यासाठी आणले होते. यानंतर त्यांनी हरभरे खाल्ले आणि झोपी गेले होते.
बुलंदशहरमध्ये चार जणांना अन्नातून विषबाधा
#Bulandshahr: भुने हुए चने खाने से चार लोगों की बिगड़ी तबीयत
एक ही परिवार दो लोगों की मौके पर मौत
दौलतपुर से दुकान से लेकर आए थे भुने हुए चने
दो लोगों की हालत को देखते हुए नजदीकी अस्पताल में भर्ती कराया गया
नरसैना थाना क्षेत्र के गाव बरवाला का मामला@bulandshahrpol @Uppolice pic.twitter.com/4tc94bbroV
— NiwanTimes (@NiwanTimesInd) November 25, 2024
काही वेळाने कलुआ आणि मुलांना उलट्या होऊ लागल्या. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यामध्ये कलुआ आणि एका मुलाचा मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांनी मृताची पत्नी आणि एका मुलीला सायनाच्या रुग्णालयात रेफर केले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर गावात व मृताच्या कुटुंबात शोककळा पसरली असून कुटुंबीयांच्या रडण्याने शोककळा पसरली आहे.