Manipur Soldiers Firing : मणिपूरमध्ये लष्कराने कारवाई करत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेनंतर मणिपूरमधील काही महिला आंदोलकांनी ११ जणांना आणि त्यांच्या जवळील शस्त्रांना माघारी करण्यासाठी सैनिकांना घेराव (Manipur protest) घातला. त्यावर आंदोलकांना पांगवण्यासाठी सैनिकांचा हवेत गोळीबार (Air fire) केला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार ते 11 जण "ग्राम संरक्षण स्वयंसेवक" आहेत. त्यांच्याजवळील शस्त्र काढून घेतल्यास गावात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. जातीय संघर्षामुळे मणिपूरमध्ये 210 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 50,000 विस्थापित लोक अजूनही छावण्यांमध्ये राहत आहेत. (हेही वाचा :Manipur violence: मणिपूरमधील इंफाळ शहरातून जमावाकडून 4 जणांचे अपहरण, एक पळून जाण्यास यशस्वी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)