Ajit Doval Met Sheikh Hasina at Hindon Airbase: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची हिंडन एअरबेसवर भेट घेतली. भारतीय हवाई दल आणि इतर सुरक्षा एजन्सी त्यांना सुरक्षा पुरवत आहेत. शेख हसीना यांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. शेख हसीना यांनी अजित डोवाल यांच्याशी बांगलादेशातील सद्यस्थिती आणि हिंडन हवाई तळावर त्यांच्या भविष्यातील कृतीबाबत चर्चा केली. सध्याच्या घडामोडी लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाने पूर्वेकडील प्रत्येक क्षेत्रात आपल्या जवानांना सतर्क केले आहे. (Air India Cancels Flights Due to Bangladesh Violence: हिंसक निदर्शनांदरम्यान एअर इंडियाने रद्द केली ढाक्याला जाणारी सर्व उड्डाणे; हजरत शाहजलाल विमानतळ बंद)
एएनआय ट्विट -
NSA Ajit Doval and senior military officials met the Bangladeshi Prime Minister Sheikh Hasina at the Hindon Airbase. Indian Air Force and other security agencies are providing security to her and she is being moved to a safe location: Sources pic.twitter.com/rdHb0ebE7v
— ANI (@ANI) August 5, 2024
Watch: National Security Advisor Ajit Doval met with Bangladesh Prime Minister Sheikh Hasina at Hindon Airbase pic.twitter.com/DpO8eiT8s5
— IANS (@ians_india) August 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)