Viral News: सध्या सोशल मीडियावर लूटमारीचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. 22 वर्षांपासून हरवलेला मुलगा सापडला असून तो साधू बनला असून त्याला आता घरी येण्याअगोदर 10 लाख रुपये जमा करावे लागतील, असं सांगत त्याच्या वडिलांची फसवणूक करण्यात आली आहे. ट्विटरवर @TusharSrilive या यूजरने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये हरवलेल्या मुलाच्या वडिलांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'अरुणने फोन करून सांगितले की, मी तुमचा 22 वर्षांपासून हरवलेला मुलगा आहे. मला साधू बनून परत यायचे आहे, त्यासाठी त्याला मठात 10 लाख रुपये जमा करावे लागतील. वडिलांनीही त्याच्या प्रेमापोटी 10 लाख रुपये दिले. मुलगा जेव्हा साधूच्या वेशात परत आला तेव्हा तो माझा मुलगा अरुण नव्हता. तो नफीस असून तो अमेठीचा आहे,' असं अरुणच्या वडिलांनी सांगितलं आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)