बिग बॉस मराठी 4 च्या घरात स्पर्धकांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. चार चॅलेंजर्सच्या एंट्रीनंतर घरात वातावरण बदलल्यानंतर आता हाताच्या दुखापतीमुळे तेजस्विनी लोणारीला घरातून एक्झिट घ्यावी लागत आहे. मागील आठवड्यात टास्क दरम्यान हाताला दुखापत झाल्याने तेजस्विनीला बिग बॉसने सक्तीचा आराम दिला होता पण आता तिच्या हाताची दुखापत पाहता वैद्यकीय सल्ल्यानुसार ती घराबाहेर पडत असल्याचं  जाहीर करण्यात आलं आहे. नक्की वाचा: BBM 4: बिग बॉस मराठी 4 ची स्पर्धक Tejaswini Lonari साठी Ranveer Singh कडून खास शुभेच्छा (Watch Video) .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)