Kavita Kaushik Quits TV Industry: ‘कुटुंब' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री कविता कौशिकने अनेक टीव्ही शोमध्ये विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. एकता कपूरचा सुपरहिट शो 'कहानी घर घर की' यासह 'कोई अपना सा', 'पिया का घर' अशा अनेक डेली सोपमध्ये ती दिसली होती. 'एफआयआर' या कॉमेडी शोमधून कविताला ‘चंद्रमुखी चौटाला’द्वारे विशेष प्रसिद्धी मिळाली. आता 23 वर्षे छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर कविता कौशिकने टीव्ही इंडस्ट्रीला राम राम ठोकला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कविता कौशिकने सांगितले की, तिने टीव्ही सोडला आहे. तिला सतत खलनायक भूमिका ऑफर केल्या जात होत्या, त्यामुळे ती वैतागली होती. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना कविता म्हणाली- मला टीव्ही करायचा नाही. मी वेब सिरीज आणि चित्रपट करायला तयार आहे. कविता कौशिकने टीव्ही कंटेंटबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली, ‘टीव्ही कंटेंटही खूप मागास-विचाराचा बनला आहे. त्यामुळे मला त्याचा भाग व्हायचे नाही.’ (हेही वाचा: Bigg Boss OTT 3 विरोधात अश्लीलतेची तक्रार, शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)