Divyanka Tripathi And Vivek Dahiya Robbed: टीव्ही स्टार दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया हे दोघे त्यांच्या युरोप ट्रिपदरम्यान अडचणीत सापडले आहेत. हे दोघेही त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस युरोप ट्रीपवर आहेत. यावेळी फ्लोरेन्समध्ये त्यांना लुटण्यात आले आहे. या जोडप्याचे पाकीट, पासपोर्ट, 10 लाख किमतीच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. या दोघांनीही सोशल मीडियावर ही माहिती दिली, तसेच फ्लोरेंस पोलिसांकडून कोणतीही मदत न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी भारत सरकारकडेही मदत मागितली आहे. ETimes ला दिलेल्या मुलाखतीत विवेकने त्यांच्यासोबत झालेल्या घटणेच वर्णन केले. विवेक म्हणाला, ते दोघे बुधवारी युरोप मधील फ्लोरेन्स हे सुंदर शहर पाहण्यासाठी तिथे पोहचले. या ठिकाणी त्यांचा एक दिवस मुक्काम होता. यावेळी ते एक रिसोर्ट पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे सर्व समान कारच्या आत सोडले होते. मात्र, जेव्हा ते सामान घेण्यासाठी परत आले, तेव्हा समोर दिसलेले चित्र पाहून त्यांना धक्का बसला. त्यांच्या कारमधील सामानाची चोरी झाली होती. चोरांनी त्यांचे पासपोर्ट, पाकीट, पैसे, आतापर्यंत खरेदी केलेले सामान आणि इतर काही मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या.

पुढे विवेक म्हणाला की, त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आमची केस फेटाळून लावली. पोलीस म्हणाले त्या विशिष्ट भागात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याशिवाय ते आम्हाला मदत करू शकत नाहीत. पोलीस स्टेशन संध्याकाळी 6 वाजता बंद होते, आणि त्यानंतर, ते कोणतीही मदत देऊ शकत नाहीत. त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने तेही बंद झाले होते. हेही वाचा: Divyanka Tripathi Hospitalized After Accident: टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, फ्रॅक्चरमुळे होणार शस्त्रक्रिया!

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)