Balkaur Singh : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसवाला (Sidhu Moosewala) याच्या कुटुंबात दोन नवीन पाहून्यांच्या (Twin Babies) आगमनाची सर्वचजण वाट पाहत आहेत. सिद्धू मूसवाला याची आई चरण कौर प्रेग्नेंट असून लवकरच त्या बाळांना जन्म देण्याची शक्यता आहे. मात्र, या दरम्यान गायकाच्या आईने आधीच जुळ्या मुलांना जन्म दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर आता सिद्धूचे वडील बलकौर सिंग (Balkaur Singh) यांनी स्पष्टीकरण दिल आहे. त्यांनी फेसबुक हँडलवर प्रतिक्रीया दिली. त्यांनी लिहिले की, "आम्ही सिद्धूच्या चाहत्यांचे आभारी आहोत ज्यांना आमच्या कुटुंबाची काळजी आहे. त्यांना विनंती करतो की सध्या अनेक अफवा पसरत आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती असेल तर आम्ही तुमच्यासोबत शेअर करू." (हेही वाचा :Sidhu Moosewala Murder Case: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोई भारतीय पोलिसांच्या ताब्यात, अझरबैझान येथून प्रत्यार्पण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)