मराठीतील बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जबरदस्त कमाई केली होती. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ‘झिम्मा 2’मध्ये या अभिनेत्रींबरोबर आणखी दोन नव्या अभिनेत्रींची एंट्री झाली आहे. ‘झिम्मा 2’मध्ये रिंकू राजगुरू व शिवानी सुर्वेही झळकणार आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, चैत्राली गुप्ते, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)