Kranti Redkar Gets Death Threats: मराठी अभिनेत्री आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर-वानखेडे हिला मोबाईल फोन आणि व्हॉट्सॲपवरून धमक्या येत आहेत. याबाबत क्रांतीने गोरेगाव पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली असून, अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. गेल्या एक वर्षापासून अशा धमक्या येत असल्याचे क्रांतीने सांगितले आहे. तिच्या तक्रारीनुसार, 6 मार्च रोजी सकाळी 10:49 वाजता, तिला युनायटेड किंगडममधून +441792988111 वरून कॉल आला. अज्ञात कॉलरने तिला शाब्दिक शिवीगाळ केली आणि तिला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याव्यतिरिक्त, तिला त्याच दिवशी सकाळी 10:59 वाजता +923365708492 क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेश प्राप्त झाला, जो पाकिस्तानी फोन नंबर आहे. या संदेशांमध्ये अपमानास्पद आणि चारित्र्यभंग करणारा मजकूर होता. त्यानंतर तिने याबाबत तक्रार दाखल केली. आपल्या तक्रारीत तिने स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याबाबत झोन-11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईत यांनी सांगितले की, त्यांना याबाबत अर्ज मिळाला आहे. ते प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करतील. (हेही वाचा: Online Fraud Training: अवघ्या 21 वर्षीय विद्यार्थ्याने 500 तरुणांना दिले ऑनलाइन फसवणुकीचे प्रशिक्षण; टेलीग्राम चॅनेल आणि इतर तंत्रे ऑपरेट करण्यास शिकवले, पोलिसांकडून अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)