कोविड नंतर प्रेक्षकांना सिनेमागृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी ठरलेल्या झिम्मा सिनेमाचा सिक्वेल येणार याची घोषणा यापूर्वीच झाली होती. आता या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करत त्याची उत्सुकता देखील संपली आहे. झिम्मा 2, 24 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. एका युरोप टूर वर आणलेल्या महिलांच्या ग्रुपची धम्माल मस्ती आणि त्यामधून त्यांच्या भावविश्वातील नाजूक विषयांना हात लावणारा हा सिनेमा सुपरहीट ठरला होता.आता त्याच्या सिक्वेल मध्ये काय पाहता येणार याची उत्सुकता महिलावर्गाला लागली आहे. Jhimma 2 Teaser: 'झिम्मा 2' येणार दसर्‍याच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला; इथे पहा टीझर (Watch Video)

पहा झिम्मा 2 कही झलक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)