महाराष्ट्राचं राज्यगीत ' जय जय महाराष्ट्र माझा' ची पुन्हा निर्मिती करण्यात आली आहे. या गाण्याला स्वरसाज अजय गोगावले याचा आहे. 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाच्या निमित्ताने ही पुन्हा निर्मिती करण्यात आली आहे. आज एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते हे गाणं लॉन्च करण्यात आले आहे. राज्य सरकार कडून काही दिवसांपूर्वीच 'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. नक्की वाचा: Maharashtra Shaheer Trailer: अभिनेता Ankush Chaudhari ची मुख्य भूमिका असलेला शाहीर साबळेंच्या जीवनपटाचा ट्रेलर जारी (Watch Video) .
पाहा नव्या अंदाजात जय जय महाराष्ट्र माझा
प्रख्यात शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या प्रसिद्ध गीताचे प्रकाशन आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई इथे करण्यात आले. या गीताच्या माध्यमातून शाहीर साबळे यांच्या आठवणींना उजाळा देता आला.
एक काळ असा… pic.twitter.com/VVlmjj9NiJ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)