दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्या 'हर हर महादेव' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने एक मोठा इतिहास रचला आहे. हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट असेल. हा चित्रपट एका खऱ्या लढाईची प्रेरणादायी कथा आहे, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती बाजी प्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली केवळ 300 सैनिकांनी 12,000 शत्रू सैनिकांवर विजय मिळवला होता. झी स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शरद केळकर बाजी प्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)