‘एका काळेचे मणी' ही एक धमाल वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असुन या सीरिजचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून या वेबसिरीजचे दिग्दर्शन अतुल केतकर यांनी केले आहे. या मालिकेची संकल्पना ऋषी मनोहर याची असून ओम भूतकर याने याचे लिखाण केले आहे. या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठी नाटकक्षेत्राचे सुपरस्टार प्रशांत दामले मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्यांच्याबरोबर हृता दुर्गुळे, वंदना गुप्ते, पौर्णिमा मनोहर, ऋषी मनोहर, रुतुराज शिंदे इत्यादी प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. आणि यातील अजून एक मुख्य आकर्षण म्हणजे सध्याचे कॉमेडीस्टार समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार देखील यात सहभागी असणार आहेत.
जिओ स्टुडिओज् आणि महेश मांजरेकर घेऊन येत आहेत समीर चौघुले, विशाखा सुभेदार, ऋता दुर्गुळे, वंदना गुप्ते, पौर्णिमा मनोहर, ऋषी मनोहर, ऋतुराज शिंदे आणि… प्रशांत दामले, यांची
धम्माल वेब सिरीज 'एका काळेचे मणी!’@prashant_damle #PournimaManohar @hrutad @vandana_gupte @SamirChoughule
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) August 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)