अभिनेता अंकुश चौधरी देखील कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. अंकुशने ट्वीट करत आपण कोविड पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान त्याच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं, कोविड टेस्ट करून घेण्याचं आवाहन केले आहे. लवकरच अंकुशचा 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' हा सिनेमा रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या या सिनेमाच्या प्रमोशन साठी त्याने बिग बॉस मराठी माध्ये हजेरी लावली होती.
अंकुश चौधरी ट्वीट
नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॅाझिटीव्ह आली आहे. डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत आणि तुमचे आशिर्वाद आहेच. कोरोना वर मात करून पुन्हा त्याच जोशात आणि त्याच जोमात पुन्हा तुमच्यासमोर येईन.माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्यावी.
— Ankush (@imAnkkush) January 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)