सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे ने देखील थेट लग्नाच्या विधींना सुरूवात होण्यापूर्वी आपल्या लग्नाची गोड बातमी देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. गौतमी स्वानंद तेंडुलकर सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. स्वानंद हा डिजिटल क्रिएटर आहे. तो भाडिपा  चा Vice President - Business, Head - Brand solutions आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नात्याची चर्चा होती पण दोघांनीही त्याबाबत खुलेआम बोलणं टाळलं होतं. आज गौतमीचा मेहंदीचा सोहळा आहे. त्यानिमित्ताने 'गुलाबी' रंगामध्ये त्यांचे कपडे आणि सजावट करण्यात आल्याचे फोटोज शेअर केले आहेत. Mugdha-Prathamesh Wedding: मुग्धा वैशंपायन - प्रथमेश लघाटे अडकले विवाहबंधनात (Watch Video) .

पहा गौतमीची पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)