रतन टाटा यांनी मुंबई मध्ये काल (9 ऑक्टोबर) अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्त केवळ उद्योग विश्व नव्हे तर सामान्य नागरिकही हळहळला. जर्मनी मध्ये Dil-Luminati World Tour कॉन्सर्ट दरम्यान Diljit Dosanjh ला टाटांच्या निधनाचं वृत्त समजताच त्यानेही कॉन्सर्ट थांबवत त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी त्याने रतन टाटा यांनी "आयुष्यात नेहमीच कठोर परिश्रम केले, चांगले काम केले आणि मदत केली. हे जीवन आहे, असेच असावे. त्याच्या जीवनातून आपण जर एक गोष्ट शिकू शकतो, ती म्हणजे आपण कठोर परिश्रम केले पाहिजे, सकारात्मक विचार केला पाहिजे, मदत केली पाहिजे आणि जीवन पूर्णतः जगले पाहिजे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली." असं म्हटलं आहे. Shantanu Naidu ने 'Goodbye, my dear lighthouse' म्हणत गुरू Ratan Tata यांना अर्पण केली श्रद्धांजली; पहा हा टाटांचा अवघ्या 29 वर्षांचा मॅनेजर कोण?
Diljit Dosanjh ने जर्मनीत कॉन्सर्ट थांबवत टाटांना अर्पण केली श्रद्धांजली
Diljit Dosanjh paid tribute to Ratan Tata during his concert in Germany. He said that Ratan Tata has always worked hard throughout his life and has never spoken ill of anyone. ‘We should learn from him,’ he added. @diljitdosanjh #ratantata pic.twitter.com/02WXRNnE9N
— Gagandeep Singh (@Gagan4344) October 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)