Vivek Agnihotri Apology: विवेक अग्निहोत्री यांनी दिल्ली उच्च न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून त्यांची बिनशर्त माफी मागितली आहे. 2018 मध्ये न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीबद्दल त्यांनी पश्चात्तापाचा पुनरुच्चार केला. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री आज न्यायालयात हजर राहिले होते. विवेकला ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस मुरलीधर यांच्या विरोधात केलेल्या ट्विटबद्दल माफी मागण्याचे आदेश देण्यात आले होते. वास्तविक, त्यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस मुरलीधर यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम नवलखा यांना जामीन दिला होता. याच्या निषेधार्थ विवेकने काही ट्विट केले होते. मात्र, न्यायालयाचा अवमान केल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले. त्यानंतरही न्यायालयाने त्यांना १६ मार्च २०२३ रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. (हेही वाचा - Pushpa 2: अल्लू अर्जुनने 'फायर पुष्पा' भूमिकेसाठी घेतलं 'इतकं' मानधन; तेलुगु चित्रपटसृष्टीत केला नवा विक्रम)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)