Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या घरात रोजन नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. त्यात निक्की तांबोळी ही स्पर्धक सद्या चर्चेत आहे. त्यानंतर जान्हवी किल्केकर ही स्पर्धक देखील आतापर्यंत चर्चेत राहिली आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये जान्हवी आणि वर्षा ताई या एकमेकांशी भांडताना दिसल्या. या वादामुळे नेटकऱ्यांकडून जान्हवी ट्रोल होत होती. हा वाद शांत झाल्यानंतर बिग बॉसच्या घरात जान्हवी आणि वर्षा ताई थिरकल्या आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाऊ द्याना घरी या मराठी गाण्यांवर दोघी डान्स करताना दिसत आहे. वर्षा ताईंची अदा पाहून नेटकरी भारवले आहेत. (हेही वाचा- बिग बॉसच्या घरातील खरा गद्दार म्हणून अरबाजने घेतलं वैभवचं नाव; सर्वच सदस्यांना बसला धक्का)
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)