Ulajh Teaser:  जान्हवी कपूर आता नव्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. बुधवारी तिच्या आगामी चित्रपटचे टीझर रिलीज झाले आहे. 'उलझ' या चित्रपटात जान्हवी कपूर झळकणार आहे. चित्रपटात जान्हवी कपूर सोबत गुलशन देवैया आणि रोशन मैथ्यू मुख्य भुमिकेत झळकणार आहे. 'उलझ' चित्रपटाचे दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुधांशु सरिया यांनी केले आहे. उलझ चित्रपट येत्या ५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. उलझ चित्रपटाचे टीझर पाहून नेटकऱ्यांनी चित्रपटांची उत्सुकता दाखवली. अनेकांनी या व्हिडिओवर कंमेट केले आहे. टीझर पाहून जान्हवीच्या लुकचे कौतुक करत आहे. (हेही वाचा- झपाटलेला 3' सिनेमाचं पोस्टर रिलीज, पुढच्या वर्षी येणार प्रेक्षकांच्या भेटीला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)