Ae Dil Zara Song Out: अभिनेता अजय देवगण आणि तब्बूचा बहुप्रतिक्षिच चित्रपट 'औरो मे कहाॅं दम था' यातील एक गाण प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'ए दिल जरा' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. गाणं रिलीज होताच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. गाण्याची सुरुवात जेलच्या दृश्यातून होताना दिसत आहे. अमला चेबोलू आणि ऋषभ चतुर्वेदी यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. संगीत आणि संगीतकार एम.एम. क्रीम, तर गीते मनोज मुंतशीर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, जिमी शेरगिल, शंतनू माहेश्वरी आणि सई मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले असून फ्रायडे फिल्मवर्क्स आणि एनएच स्टुडिओज यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या ५ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ( हेही वाचा- शर्वरी वाघने सुरू केली ॲक्शन फिल्म 'अल्फा' ची शूटिंग, आगामी चित्रपटात दिसणार आलिया भट्टसोबत
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)