The Pride of Bharat: कर्नाटकचा सुपरस्टार ऋषभ शेट्टी त्याच्या 'कंतारा’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागामुळे चर्चेत आहे. निर्माते या चित्रपटाबद्दल सतत नवीन अपडेट्स शेअर करत आहेत. 2022 मध्ये रिलीज झालेला 'कंतारा' प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. ऋषभ शेट्टीचा ' कंतारा 2' ऑक्टोबर 2025 मध्ये पडद्यावर येणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अभिनेता त्याच्या अजून एका नवीन चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. ऋषभ शेट्टी 'छत्रपती शिवाजी महाराज' या पिरियड ड्रामा चित्रपटात दिसणार आहे, याची अधिकृत घोषणा करण्यात आली. निर्मात्यांनी चित्रपटातील ऋषभ शेट्टीचे फर्स्ट लूक पोस्टर देखील रिलीज केले आहे, ज्यामध्ये कन्नड अभिनेता मराठा योद्धा 'छत्रपती शिवाजी महाराज' अवतारात दिसत आहे. या पोस्टरमुळे ऋषभ शेट्टीच्या चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. संदीप सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे.
ऋषभ शेट्टीने या चित्रपटाबद्दल सांगितले की हा एक मॅग्नम ऑपस ॲक्शन ड्रामा आहे, जो एक नवीन आणि वेगळा सिनेमॅटिक अनुभव देईल. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनकथित कथेवर प्रकाश टाकेल आणि प्रेक्षकांना एक नवीन दृष्टीकोन देईल. (हेही वाचा: Pushpa 2 BTS Viral Video: पुष्पा 2 रिलीज होण्यापूर्वी, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का, निर्मात्यांनी चित्रपटाचा BTS व्हिडिओ केला शेअर)
ऋषभ शेट्टी साकारणार 'छत्रपती शिवाजी महाराजां'ची भूमिका-
Our Honour & Privilege, Presenting the Epic Saga of India’s Greatest Warrior King – The Pride of Bharat: #ChhatrapatiShivajiMaharaj. #ThePrideOfBharatChhatrapatiShivajiMaharaj
This isn’t just a film – it’s a battle cry to honor a warrior who fought against all odds, challenged… pic.twitter.com/CeXO2K9H9Q
— Rishab Shetty (@shetty_rishab) December 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)