‘द केरळा स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावरून सुरू असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. आता या चित्रपटाच्या क्रू मेंबरला धमकीचा मेसेज आल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार ‘द केरळा स्टोरी’ चित्रपटाच्या क्रू मेंबरला एका अनोळखी नंबरवरून धमकीचा मेसेज आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी पोलिसांना माहिती दिली की क्रू मेंबर्सपैकी एकाला अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता. “मेसेजमध्ये त्या व्यक्तीला घरातून एकटं बाहेर न पडण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकी नंतर पोलिसांनी क्रू मेंबरला सुरक्षा पुरवली आहे,
या आधी तमिळनाडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर पश्चिम बंगालमध्येही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हा चित्रपट थिएटर्समधून हटवण्याचे आदेश दिलेत.
पहा ट्विट -
'The Kerala Story' crew member receives threat, Mumbai Police provides security
Read @ANI Story | https://t.co/WuzYXtyC5I#TheKeralaStory #MumbaiPolice pic.twitter.com/FpuJYo63Ke
— ANI Digital (@ani_digital) May 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)