Is Deepika Padukone Pregnant? अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग लवकरच आई-बाबा होणार आहेत. द वीकच्या सूत्रांनी दिलेल्या अहवालानुसार, दीपिका सध्या गरोदर आहे. नुकतेच दीपिकाने बाफ्टा अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. तेव्हापासून तिचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. बाफ्टा अवॉर्ड शो दरम्यान अभिनेत्रीचा बेबी बंप दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. लंडनमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये 77 व्या बाफ्टा पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. 18 फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला. या अवॉर्ड फंक्शनमध्ये दीपिका पदुकोणने चमकदार साडी परिधान केली होती. आपल्या गरोदरपणाची बातमी लपवण्यासाठी दीपिकाने साडी परिधान केल्याचे बोलले जात आहे. सध्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र, दोघांकडून ही आनंदाची बातमी ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता या बातमीत किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल.
Deepika Padukone pregnant with her first child: Sources #DeepikaPadukone https://t.co/53kCK2b2IM
— THE WEEK (@TheWeekLive) February 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)