Hamare Baarah: उच्च न्यायालयाने पाहिला ‘हमारे बारह’ चित्रपट; काहीही आक्षेपार्ह नसल्याची माहिती, सामाजिक संदेश देत असल्याची टिपण्णी

खंडपीठाने सांगितले की, चित्रपटाचा पहिला ट्रेलर आक्षेपार्ह होता, मात्र तो काढून टाकण्यात आला आहे आणि अशी सर्व आक्षेपार्ह दृश्ये चित्रपटातून काढून टाकण्यात आली आहेत.

Hamare Baarah: उच्च न्यायालयाने पाहिला ‘हमारे बारह’ चित्रपट; काहीही आक्षेपार्ह नसल्याची माहिती, सामाजिक संदेश देत असल्याची टिपण्णी
Hamare Baarah

‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. चित्रपटाचा टीझर इस्लामिक श्रद्धा आणि विवाहित मुस्लिम महिलांचा अपमान करत असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने नमूद केले की, आम्ही चित्रपट पाहिला असून चित्रपटात आक्षेपार्ह काहीही नाही, काही आक्षेपार्ह शब्द आणि दृश्ये काढून टाकण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर किंवा टीझर पाहून चित्रपट कसा असेल याचा अंदाज लावता येत नाही. चित्रपट न पाहता टिप्पणी करणे चुकीचे असल्याचेही न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या वकिलाला सांगितले.

न्यायमूर्ती बीपी कुलाबावाला आणि फिरदौस पूनीवाला यांच्या खंडपीठाने सांगितले की, चित्रपटाचा पहिला ट्रेलर आक्षेपार्ह होता, मात्र तो काढून टाकण्यात आला आहे आणि अशी सर्व आक्षेपार्ह दृश्ये चित्रपटातून काढून टाकण्यात आली आहेत. हा चित्रपट एक सामाजिक असून, तो खरोखरच विचार करायला लावणारा चित्रपट आहे. समाजाला सामाजिक संदेश देण्यासाठी हा चित्रपट बनवण्यात आला आहे. (हेही वाचा: JNU Jahangir National University Trailer: 'जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी'चा वादग्रस्त ट्रेलर रिलीज; सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत)

पहा व्हिडिओ- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2024 08:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).