येत्या काही दिवसांत भूमीचा (Bhumi Pednekar) भक्षक (Bhakshak Movie)  नावाचा चित्रपट येतो आहे त्यात ती एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. एका प्रमोशन इव्हेंटमध्ये भूमीनं तिला वयाच्या 14 व्या वर्षी त्या अनुभवाला सामोरं जावं लागल्याचे सांगितले. आम्ही कुटूंबातील सगळेजण बांद्र्याला भरलेल्या एका यात्रेत गेलो होतो. त्याचवेळी तो प्रसंग घडला. कुणीतरी मला वाईटपद्धतीनं स्पर्श करुन गेलं होतं. मी पटकन मागे वळून पाहिले मला काही समजलेच नाही. पुढील कित्येक दिवस तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरुन जात नव्हता. पुढे सोसायटीतील माझ्या सोबतच्या मित्रांसोबतही मी बोलू शकत नव्हते एवढा मला त्या गोष्टीचा धक्का बसला होता. अशी आठवण भूमीनं यावेळी सांगितली.

पाहा पोस्ट  -

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)